श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने नविन पनवेल केंद्रामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन

पनवेल :- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित नविन पनवेल केंद्रामार्फत श्री स्वामी पुण्यतिथी सप्ताहाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक 7 मे रोजी मारुती मंदीर , पोदी नं. 3 , सेक्टर- 17 नविन पनवेल येथे करण्यात आले होते.
स्वामी समर्थ नविन पनवेल केंद्रातील युवा प्रबोधन विभागामार्फत आयोजित या रक्तदान उपक्रमास सेवेकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग 80% सामजिक कार्य व 20% अध्यात्म याच धर्तीवर कार्यरत आहे.
Comments