पनवेल तहसिल कार्यालयामार्फत लोकसहभागातून अनाथ आश्रमांना मदतीचा हात...
पनवेल, दि. २० (वार्ताहर)- पनवेल तहसिल कार्यालयामार्फत तालुक्यातीलअनाथ आश्रमांना लोकसहभागातून मदतीचा हात देण्यात आला.     तहसील कार्यालयामार्फत तालुक्यामधील अनाथ आश्रमांचा सर्वे करण्यात आला व सदरील आश्रमांतील नागरिकांची संख्या विचारात घेता तहसिलदार कार्यालय पनवेल मार्फत लोकसहभागातून अनाथ आश्रमांना मदतीचा हात देण्यात आला आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आले. 
सिल आश्रम लोणीवली, वरलेश्वर आधारघर, वृध्दाश्रम, नेरे स्नेहकुंज आधारगृह, नेरे, शुभम वृध्दाश्रम नेरे, जनाधर्म वृध्दाश्रम, सांगटोली, आधारपुष्प सेवा सदर, वाकडी, शांतीवन कुष्ठरोगी, वाकडी, शांतीवन वृध्दाश्रम, वाकडी, शांतीवन आधारघर , वाकडी, शिवाश्रय आधारघर, उसी बु., करुणेश्वर वृध्दाश्रम, उमरोली, जनकल्याण सेवाश्रम, कोळखे, परम शांतीधाम वृध्दाश्रम अशा प्रकराच्या आश्रमांना मदतीचा हात देण्यात आला आहे.         

फोटोःपनवेल तहसिल कार्यालयामार्फतअनाथ आश्रमांना मदतीचा हात
Comments