भंगार माफियांनी केले आपल्या सहकाऱ्यांना गंभीर जखमी

पनवेल दि.२३ (वार्ताहर): कटींग झोनमध्ये आणलेला माल सर्व आम्हालाच पाहिजे असे सांगून चार जणांनी मिळून दुसऱ्या भंगारवाल्याला मारून जबर जखमी केल्याती घटना तळोजा औद्योगिक वसाहतीत घडली आहे.
        
मोहम्मद शकील शमी मोहम्मद शहा (वय-35) याने भिवंडी येथील बॉंबे स्टील कंपनीतील माल खरेदी करून सदरचा माल हा तळोजा औद्योगिक वसाहतीत कटर झोन मारूती कटर कंपनी प्लॉट नं.-सी-21-बी येथे आणला असताना त्याने त्यातील अर्धा माल आरोपी ईस्तियाक उर्फ कल्लू अदालत शाह (वय-35) याला घेऊन जाण्यासाठी बोलवले असता त्याने त्याच्यासोबत अब्दुल (पूर्ण नाव माहित नाही), अश्पाक(पूर्ण नाव माहित नाही) व खुर्शिद(पूर्ण नाव माहित नाही) यांना तेथे आणून मोहम्मद शाह याला तू येथून निघून जा, सर्व माल मी घेऊन जाईन असे सांगितले. परंतु याला त्याने नकार देताच या चौघांनी मिळून लाकडी बांबू व लोखंडी पाईपने त्याच्या दोन्ही पायाच्या गुडघ्याखाली मारहाण करून फ्रॅक्चर केले व हातापायांवर मारून जखमी केल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image