तळोजा कारागृहामधील आरोपीचा कोरोनामुळे मृत्यु...


पनवेल दि.०९ (वार्ताहर)- कोरोनाची लागण झालेला व तळोजा कारागृहात सजा भोगत असलेल्या आरोपीचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
          
सदर घटनेतील मृत आरोपी हा 26 वर्षांचा असून तो भिवंडी येथे राहण्यास होता. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी त्याला 2018 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून तो तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. या आरोपीला अस्थमा आणि हायपर टेंशनचा त्रास असल्याने त्याच्यावर कारागृहातील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याला जास्त त्रास जाणवू लागल्यानंतर त्याची एन्टीजेन चाचणी करण्यात आली. ती निगेटीव्ह आल्यानंतर त्याला उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे या आरोपीची आरटीपिसीआर चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह झाल्यानंतर त्याला कोव्हिड वरील उपचारासाठी जे.जे. रूग्णालयातून सेंट जॉर्ज रूग्णालयात हलविण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाला आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image