नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा, रोटरी क्लब ऑफ उलवे नोड व श्री साई देवस्थान साईनगर वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नधान्य किटचे वाटप

पनवेल, दि.१० (संजय कदम) ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा, रोटरी क्लब ऑफ उलवे नोड व श्री साई देवस्थान साईनगर वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्री साई देवस्थान साईनगर वहाळ येथील आदिवासी वाडीतील बांधवांकरिता अन्नधान्य किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, गव्हाण फाटा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव तसेच श्री साई देवस्थान साई नगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र पाटील, रोटरी उलवेचे प्रेसिडेंट शिरीष कडू, साईचरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य वितेश म्हात्रे, रोटेरियन अजय दापोलकर,निलेश सोनवणे व आदिवासी बांधव उपस्थित होते.
Comments