पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी तत्काळ दूर करून, मनुष्यबळ वाढवा - खा.श्रीरंग बारणे

पनवेल / दि. १० मे - पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड असून सर्व सोयी सुविधा असलेले हॉस्पिटल आहे. कोरोना रुग्णांसह इतर रुग्णावर देखील उपचार केले जातात. अनेक कोरोना रुग्ण येथे उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात मनुष्यबळ वाढवावे. डॉक्टर, औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयातील त्रुटी तत्काळ दूर करण्याचा सूचनाही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. 

रायगड जिल्ह्यातील पनवेल उपजिल्हा  रूग्णालयाला खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी)  भेट दिली.  रूग्णांची विचारपूस केली. रूग्णालयातील कोरोना वार्ड व इतर पेशंटची सविस्तर माहिती घेतली.  वैद्यकीय अधिक्षक डॅा. बसवराज लोहारे, डॉ. बालाजी फाळके, डॉ. अरुण पोहरे, सुभाष जाधव, ज्योती गुरव, माजी जिल्हाप्रमुख, जेष्ठ सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल शहर संघटक प्रविण जाधव, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे  यावेळी उपस्थित होते.

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड आहेत. सर्व सोयी सुविधा असलेले हॉस्पिटल आहे. कोरोना रुग्णांसह इतर रुग्णावर देखील उपचार केले जातात. व्हेंटिलेटर, आयसीयू, ऑक्सिजनची कमतरता भासू देऊ नका, रूग्णांना चांगली सेवा द्यावी. जिल्ह्यातील चांगल्या प्रकारचे रुग्णालय आहे. अनेक रुग्ण येथे उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले असल्याचे सांगून खासदार बारणे म्हणाले, सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती घेतली. ज्या त्रुटी आहेत. त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्या तत्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. डॉक्टर, नर्स, सर्व स्टाफ उत्तम काम करत आहे. कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. मनुष्यबळाची कमतरता आहे. याबाबत तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून डॉक्टर, औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या असून लवकरच अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यामुळे कोरोना विरोधातील लढाईला आणखी बळ मिळेल असेही त्यांनी सांगितले.  

कोरोना महामारीत खासदार श्रीरंग बारणे मतदारसंघातील सर्व कोविड रुग्णालयाला प्रत्यक्षपणे भेट देतात. माहिती जाणून घेऊन, त्रुटी दूर करण्याच्या सूचना प्रशासनाला देतात. रुग्णांशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात. रुग्णांना धीर देतात. पिंपरी-चिंचवड, मावळ, पवनेल, उरण, खालापूर, कर्जत येथील कोरोना परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतात. या महामारीत नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये, अशा सूचना प्रशासनाला देतात. कोरोना रुग्णांची पिळवणूक केली जात असेल. तर, स्वतः तिथे जाऊन संबंधितांना जाब विचारतात. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे. अक्षरशः पायाला भिंगरी लावून खासदार मतदारसंघात फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image