पनवेल परिसरात कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना विविध वस्तूंचे पार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून वाटप
पनवेल दि.02 (वार्ताहर): कोरोना वैश्विक संकटात कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करीत असताना या विषाणूंचे संक्रमण होणार नाही. त्यासाठी रस्त्यावर खडा पहारा देणाऱ्या पोलिसांची ऊर्जा वाढवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. पार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून पनवेल परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध वस्तूंचे वाटप करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पनवेल येथील पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.        

पनवेल नवी मुंबई परिसरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. या कालावधीमध्ये या विषाणूंचे संक्रमण होऊ नये यासाठी टाळेबंदी करण्यात आली. त्यामध्ये संचार आणि जमावबंदीचे आदेश वरिष्ठ पातळीवर देण्यात आले होते. याची अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस बांधव व भगिनींनी केले. सध्या कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोंगावत आहे. त्याअनुषंगाने ब्रेक द चैनची  घोषणा करून राज्य सरकारने कडक निर्बध घोषीत केले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी नवी मुंबई आणि पनवेल परिसरात पोलिस यंत्रणांकडून केली जात आहे. याकरीता नवी मुंबईचे पोलीस आयुक्‍त बिपिन कुमार सिंह यांच्या आदेशानुसार त्या त्या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणारे वाहने आणि नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याबरोबरच कोरोनाविषाणूचे संक्रमण होणार नाही. यासाठी नवी मुंबई पोलीस खडा पहारा देत आहेत. दैनंदिन कामकाज, गुन्हे अन्वेषण, गुन्हे नियंत्रण याशिवाय इतर कर्तव्य बजावत असताना कोरोना काळात पोलिस मोठ्या प्रमाणात आपली महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहेत.कडक उन्हात गस्त आणि पहार देण्याचे काम नवी मुंबई पोलिसातील कर्मचारी करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचेही आरोग्य अबाधित राहावे. कोरोना त्याचबरोबर उन्हापासून संरक्षण व्हावे या सर्व पार्श्वभूमीवर पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक प्रकारे पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी युवकचे  प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना मदतीचा हात पार्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आला आहे. कळंबोली खारघर आणि कामोठे पोलीस ठाण्यात व्हिटॅमिन सी आणि डी गोळया, ओ आर एस एनर्जी ड्रिंक, बिस्कीट बॉक्स,पाणी बॉटल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांना सुद्धा या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल,कार्याध्यक्ष शहबाज पटेल,युवा नेते अॅड तुषार पाटील, युवकचे जिल्हा सरचिटणीस रणजित नरुटे, प्रशांत रणवरे, विनोद पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी सामाजिक आंतर पाळून हा उपक्रम केला. याबद्दल संबंधित पदाधिकाऱ्यांचे पक्षाचे पनवेल निरिक्षक प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल निरीक्षक अजय आवटे यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांनी कौतुक केले आहे.        

फोटोः पार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून पोलिस कर्मचाऱ्यांना विविध वस्तूंचे वाटप
Comments