पनवेल : कोरोना असल्याने आम्हाला जामीन देण्यात यावा याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी अभय कुरुंदकर व अन्य आरोपींनी पनवेल सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.या जामीन अर्जावर येत्या दि.24 मे रोजी सुनावणी होणार आहे.
कोरोना मुळे अनेक कैद्यांना जेलमधून पॅरोलवर सोडण्यात आले आहे. यासाठी अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी अभय कुरुंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांनी पनवेल सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे.
अभय कुरुंदकर यांच्या पत्नीचे मध्यंतरी निधन झाले. त्यावेळी आपल्याला पॅरोलवर सोडावे अशी विनंती कुरुंदकर याने केली होती. मात्र न्यायालयांनी ती मान्य केली नाही.
अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या खटल्यावर कोरोना महामारीचा परिणाम होऊ नये यासाठी या खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाला केली आहे.