घरात झोपलेले असताना मोबाईलची चोरी ...

नवीन पनवेल : घरात झोपलेले असताना अज्ञात इसमाने आत प्रवेश करून 37 हजार रुपयांच्या 3 मोबाईलची चोरी केली आहे. चोरा विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
      
 प्राईम अपार्टमेंट, सेक्टर 7, खारघर येथे राहणाऱ्या वर्षा निर्मळ या रात्री जेवण करून बेडरूममध्ये झोपी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून 37 हजार रुपयांच्या 3 मोबाईलची चोरी केली.
Comments