फ्युचर ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन तर्फे कोरोनाच्या काळात ५३०० झाडांचे संगोपन...

पनवेल, दि.५ (वार्ताहर) ः करोनाच्या वाईट काळामध्ये, जवळ जवळ 5300 झाडांचे संगोपन खारघर मध्ये फ्युचर ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन ही संस्था करत आहे. ही झाडे या संस्थेने जुलै 2019 व 2020 मध्ये लावली आहेत. 
कोरोनाच्या प्रादुर्भाव मार्च 2020 ला सुरुवात झाल्यावर कडक लॉकडाऊन देशभरात करण्यात आले या काळात कोण कोणाच्या घरात जाऊ शकत नव्हते तर आज किती आपल्या विभागात किती रुग्ण सापडले याची चर्चा होत होत्या, खारघर मधील सेक्टर 9 येथील झाडांचे संगोपन कसे होईल उन्हाळाच्या दिवसात कोण पाणी घालणार हा प्रश्‍न पडल्यावर फ्युचर ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन संस्था पुढे येऊन त्याचे संगोपन करण्यास सुरुवात केली.
आम्ही फक्त झाडेच लावत नाहीत तर त्या झाडांचे संगोपन देखील करतो. खारघर मधील समविचाराच्या वृक्ष प्रेमींनी एकत्र येऊन सुरवातीला ट्री पॅरेटींग या नावाने ग्रुप बनविला व फ्युचर ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन ही संस्था बनवून या संस्थेच्या माध्यमातून  झाडांचे संगोपन ही संस्था करत आहे. यामध्ये झाडांना पाणी घालणे, झाडांभोवतालचे गवत काढणे, आळी करणे, काठ्यांचा आधार देणे, खत घालणे इ. कामे करून आजपर्यंत खारघर मधील 9 मैदानावरील  5300 झाडे यशस्वीपने जगविली आहेत. या कामामध्ये डॉ स्वामींनाथ ढवळे, प्रकाश पालकर, प्रो. सचिन देशपांडे, पियुष मलिक, गजराज, संभाजी देवकर या सर्वांचा झाडांचे संगोपन करण्यासाठी खूप मोलाचा वाटा आहे. आता झाडांचे महत्व सर्वांना पटत असून ऑक्सिजन देखील किती महत्त्वाचा हे ही कळत आहे.
Comments