पनवेल(प्रतिनिधी): कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाळा विभाग भाजप कडून परिसरात मोफत सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात तसेच लसीकरण केंद्रापर्यंत नागरिकांना मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे,.कोरोनाने आता शहरी भागासहीत ग्रामीण भागात देखील प्रादुर्भाव वाढवला आहे. ग्रामीण भागात नागरिकांपर्यंत कोरोनासंदर्भात जनजागृती करून कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत . सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि हात धुणे या त्रिसूत्री चा वापर व्हावा असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याचा आणि नागरिकांची सुरक्षितता करण्याचा उद्देश समोर ठेवून कर्नाळा भाजपच्या वतीने मोहीम सुरू झाली आहे. तारा गाव, NH 17 या मार्गावरील कर्नाळा टोल वर कार्यरत असणारे पोलिस वर्ग, बांधनवाडी गाव तसेच खैराटवाडी या विभगात N95 मास्क आणि सॅनेटायझर मोफत वाटप करण्यात आले.यावेळी तारा गाव बूथ अध्यक्ष जितेंद्र सुरेंद्र पाटील,पनवेल तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष दिनेश विठ्ठल पाटील,बूथ उपाध्यक्ष हरेश्र्वर लक्षण पाटील, केलवने युवा मोर्चा अध्यक्ष रोशन मधुकर पाटील, केळवने पंचायत समिती उपाध्यक्ष दिपक पाटील,हर्षल तेजे,मोहन पांडुरंग पाटील,शशिकांत अनंत पाटील तसेच तारा गाव भाजप कार्यकर्ते महादेव ठाकूर,प्रमोद पाटील,राजेंद्र म्हात्रे,रामकृष्ण पाटील,हेमंत पाटील,अमित पाटील,वीरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.तसेचं आजचं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला ऋशिकेश निळकंठ पाटील (वरचे ओवळे)यांचे मोलाचे योगदान लाभले.
भाजपकडून कर्नाळा परिसरात मास्क व सॅनिटायझरचे वाटप
• Anil Kurghode