४ लाख ६१ हजारांची ऑनलाईन फसवणूक...
४ लाख ६१ हजारांची करण्यात आली ऑनलाईन फसवणूक

पनवेल दि.02 (संजय कदम): इंडिया गेट राईस या वेबसाईटवरून आपण एक्सपोर्ट मॅनेजर असल्याचे भासवून दोघा जणांनी पनवेल मधील एकाची 4 लाख 61 हजार 500 रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
           
फिर्यादी जमपालसिंग राजपूत (वय-40) यांची शिरढोण या ठिकाणी जय हो एक्सपोर्ट कंपनी असून यातील आरोपींनी आपसात संगनमतर करून दोन वेगवेगळ्या नंबरवरून तसेच त्यांच्या इमेल आयडीवरून ते इंडिया गेट राईसचे एक्सपोर्ट मॅनेजर असल्याचे भासवून राजपूत यांचा विश्वास संपादन करून इंडिया गेट राईस या वेबसाईटवर दिलेला संपर्क क्रमांक व इमेल आयडीच्या आधारे त्यांना इंडिया गेट राईस व्यवहारात मालाची डिलेव्हरी न देता तसेच घेतलेली रक्कम परत न करता लबाडीच्या इराद्याने त्यांना त्यांच्या अकाऊंटवर रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडून एकूण 4 लाख 61 हजार 500 रूपयांची रक्कम ऑनलाईन फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image