रोटरी खारघर आणि मनुस्मृती ज्येष्ठ नागरिक घर यांच्या सहकार्याने रोटरी मनुस्मृती मेडिकल सेंटर लसीकरण केंद्र सुरू...

पनवेल, दि. २० (वार्ताहर) ः रोटरी खारघर आणि मनुस्मृती ज्येष्ठ नागरिक घर यांच्या सहकार्याने, पनवेल महानगरपालिकेने त्यांना रोटरी मनुस्मृती मेडिकल सेंटर , सेक्टर 30, ओवे गाव, खारघरला कोरोनाचे लसीकरण केंद्र सुरू  केले आहेत. अशी माहिती रोटरी खारघर मिड टाऊनचे अध्यक्ष कमलेश अगरवाल यांनी दिली. 

आज 200 लोकांचे लसीकरण एकदम सुरळीतपणे झाले. रोज 200-300 लोकांना लसीकरण देण्यात येईल असे डॉ.किरण कल्याणकर ( रोटरी प्रोजेक्ट डायरेक्टर) यांनी माहिती दिली. या केंद्राचा फायदा खारघरच्या जवळपासच्या गावातील लोकांना आणि तळोजा रहिवाशांना होईल अशी माहिती रोटरी ट्रस्ट चे अध्यक्ष शाम फडणीस यांनी दिली. हे लसीकरण पूर्णपणे मोफत आहे. लोकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन रोटरी खारघरचे ज्येष्ठ रोटारिअन कमलेश धारगळकर यांनी केले आहे.


फोटो ः रोटरी खारघर आणि मनुस्मृती ज्येष्ठ नागरिक घर यांचा सहकार्याने रोटरी मनुस्मृती मेडिकल सेंटर लसीकरण केंद्र
Comments