खारघरमध्ये दीड कोटी खर्चातून पावसाळीपूर्व कामे


पनवेल, दि. २१ (वार्ताहर) ः खारघर वसाहतीत पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना सुरुवात झाली असून या कामासाठी सिडको दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. सदर कामासाठी एकूण 81 एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.

खारघर वसाहतीत पावसाळा पूर्वी करावयाची कामे एप्रिल महिन्यात अथवा 15 मे पूर्वी करणे आवश्यक आहे. मात्र, सिडको आपल्या जुन्या परंपरे नुसार दरवर्षी मे अखेरीस पावसाळी कामाला सुरुवात करते. खारघर सेक्टर-2 ते 25 आणि 26 ते 40 असे दोन भाग असून यासाठी दोन कार्यकारी अभियंता अंतर्गत कामे केली जात आहेत. विशेषतः खारघर सेक्टर-1 ते 21 परिसरात गावे आणि वसाहतीचा समावेश आहे. त्यात खारघर सेक्टर-12 मधील बियुडीपी वसाहतीत गटारे आणि रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे पावसाळी कामे करुनही सेक्टर-12 मधील गोखले शाळेच्या मागील रस्त्यावर पाणी तुंबते. तर सेक्टर-10 कोपरा गावालगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जाणार्‍या रस्त्यावर पावसाळ्यात नेहमी पाणी तुंबलेले असते. ‘सिडको’कडून मे अखेरीस पावसाळा पूर्व कामे केली जात असल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 
दरम्यान, खारघर सेक्टर-1 ते 25 सेक्टर मधील कामासाठी जवळपास एक कोटी तर खारघर सेक्टर- 26 ते 40 या सेक्टर मधील कामांसाठी 60 लाखाहून अधिक रुपये खर्च करुन पावसाळी कामे करण्यात येणार आहेत, असे सिडको अधिकार्‍यांनी सांगितले.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image