खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन समोरील पान टपरीतून विदेशी सिगारेटचा साठा हस्तगत


पनवेल, दि.१४ (संजय कदम) ः खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन समोरील पान टपरीमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेटची विक्री बेकायदेशीररित्या करण्यात येत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळताच त्यांनी कामोठे पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सिगारेटचा साठा हस्तगत केला आहे.
खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन समोरील जिवेश पानटपरीवर विदेशी सिगारेटची पाकिटे विक्रीसाठी ठेवण्यात येत असून सदर सिगारेटच्या पाकीटावर शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे योग्य आकाराचे वैधानिक चित्र व वैधानिक इशारा नसतो. तसेच त्यांनी केंद्र शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थ अधिनियमाचा भंग केल्याने त्या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वपोनि जयराज छापरिया यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून अजय सिंग (23) याला ताब्यात घेवून त्या ठिकाणावरुन जवळपास 6 हजाराच्या किंमतीची सिगारेटची पाकिटे हस्तगत करण्यात आली आहेत.
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image