पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतला 'माझी वसुंधरा" पर्यावरण उपक्रम नवी मुंबई व रायगड औद्योगिक वसाहतीत राबविला जाणार
पनवेल दि.0७ (संजय कदम)- १ जानेवारी २०२१ रोजी शासनाच्या 'माझी वसुंधरा' ह्या वसुंधरेच्या संरक्षण व संगोपनाच्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. माझी वसुंधरा योजनेतून प्रत्येकाने मी झाडे लावणारच आणि संगोपन करून पर्यावरणात बदल घडवून आणायची शपथ घ्यायची आहे. हा उपक्रम शासनाच्या सर्व विभागातून सुरू करून निसर्गातील पंचमहाभूतांवर कार्य करणे अपेक्षित आहे म्हणून, ह्याच उपक्रमाच्या माध्यमातून युवासेनेचे राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'माझी वसुंधरा' हा पर्यावरण संरक्षण कार्यक्रम नवी मुंबई व तळोजा औद्योगिक क्षेत्र येथील औदयोगिक वसाहतीत राबविण्याचा मानस केला आहे.                      
 या संदर्भात जनजागृती व योजनेची माहिती औद्योगिक कंपन्या, फॅक्टरी, जिथे प्रदूषण प्रादुर्भाव होत आहे व तिथेच माझी वसुंधरा मोहिमेचे महत्व पोहचण्यासाठी लवकरच या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ नवी मुंबईचे डी.बी. पाटील आणि तळोजा इंडस्ट्री असोसिएशनचे सतीश शेट्टी यांच्या सहयोगाने झाडे संगोपन, संरक्षण, यासाठी ठोस मोहीम राबविण्यात येणार आहे. रुपेश पाटील यांनी या योजनेच्या प्रसारा करिता काही योजना आखल्या आहेत, आपल्या कार्यालयात, घरात, डेस्क अथवा इतर इनडोअर जागी एक मग डिझाइन केला आहे त्यावर 'माझी वसुंधरा" लोगो, झाडे लावा पृथ्वी वाचवा असा मेसेज दिला असून त्या छोट्या मग मध्ये एक छोटे इनडोअर प्लांट दिले गेले आहे. रुपेश पाटील यांच्या मते हे झाड लावलेला मग प्रत्येकाला गिफ्ट देऊन पर्यावरणाचा संदेश देता येणार आहे. आणि त्यातून झाड लावण्याची प्रेरणा दिली जाणार आहे. ह्याच योजने अंतर्गत एक वेब लिंक देण्यात आली असून त्या लिंकवर जाऊन आपण एक प्रतिज्ञा घायची आहे त्यात आपण 5 झाडे लावून मी त्याचे संगोपन करणार अशी प्रतिज्ञा असून ती  घेणाऱ्यास शासनाचे आणि या योजनेचे एक सर्टिफिकेट मिळणार असून त्यातून आपण पर्यावरण मित्र होणार आहेत. 
ही संपूर्ण योजना कारखाने, शाळा, घरोघरी पोहचावे ह्या करिता हा उपक्रम घेण्यात येत असून याची सुरुवात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सोबत व औद्योगिक क्षेत्र तळोजा अंतर्गत लवकरच करण्यात येणार आहे. प्रदूषण मंडळाचे रिजनल ऑफिसर डी बी पाटील यांना 'माझी वसुंधरा' मग व एक झाड देऊन या योजनेची सुरुवात कोकण भवन येथे करण्यात आली आहे.         


फोटोः माझी वसुंधरा योजने अंतर्गतयुवासेनेचे राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील हेप्रदूषण मंडळाचे रिजनल ऑफिसर डी बी पाटील यांनामग व एक झाड देऊन ह्या योजनेची सुरुवात करताना
Comments