शिवसेना कामोठे शहरच्यावतीने मोफत सॅनिटायझर फवारणी ....

पनवेल, दि. २४ (वार्ताहर) ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20%राजकारण या सुत्रास अनुसरुन सामाजिक बांधिलकीतुन शिवसेना कामोठे शहरच्यावतीने वसाहतीमध्ये मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
शिवसेना कामोठे शहरच्या माध्यमातून  शिवसेना कामोठे शहरप्रमुख राकेश रोहिदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली   प्रभाग क्र-11 मधील सर्व सेक्टर 5, 6, 6अ, 8, 9, 21, 22, 24, 25 मध्ये सर्व बिल्डिंगमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात कारोनाच्या महामारी पासून सुरक्षा होण्यासाठी मोफत सॅनिटाईज होणार आहे सेक्टर 8 मध्ये मोफत सॅनिटाईज करून देण्यात आली आहे. व अजूनही कामोठे मध्ये प्रभाग 11 मध्ये सॅनिटाईज मोफत फवारणी उपक्रम चालूच राहणार आहे. कोरोना विषाणु ची दुसरी लाट हि भीषण संक्रमणाची असुन अतिशय घातक आहे. प्रभाग 11 ठिकाणी औषध फवारणी करण्याचे काम वेगाने चालू आहे. घाबरू नका. हि लढाई शस्त्र रूपी नसुन. माणुसकी रूपी आहे. मास्क वापरा, वारंवार हात धुवा, एकमेकांमध्ये अंतर ठेवून ऊभे रहा. कामोठे शहर सोसायटी मधील सर्व सभासद व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन कामोठे शिवसेना शहर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments