लग्न समारंभास शासकीय नियमापेक्षा अधिक लोक जमविल्याविरुद्ध तालुका पोलिसांच्या कारवाया

पनवेल, दि.६ (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नेरे गावातील आताशा रिसॉर्ट वर लग्न समारंभास शासन नियमापेक्षा अधिक लोक जमल्याने तसेच करंबेळी येथील एका लग्न कार्यालयात सुद्धा अधिक लोक जमल्याने तसेच तालुक्यातील बेलवली गाव येथेही अशाच प्रकारे लग्न सोहळ्यात लोक जमविल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
कोविड 19 या संसर्ग जन्य आजाराचा प्रसार होऊ  नये दिवसागणिक वाढणारी रुग्ण संख्या आटोक्यात यावी या करिता महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शासन आदेशाप्रमाणे लग्न समारंभास 25 हुन अधीक लोक जमण्यास मनाई असताना आताशा रिसॉर्ट मध्ये 100 ते 150 लोक या लग्न सोहळ्यास उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. आताशा रिसॉर्ट ला जाताना पनवेल तालुका पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी असून तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना या रिसॉर्ट वर इतक्या गाड्या जात आहेत त्यांना अडवले का नाही असा प्रश्‍न नेरे गावातील जनता करीत आहेत. त्याचप्रमाणे करंबेळी येथे लग्न कार्यक्रमासाठी नागरिक जमवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 9 जणांविरोधात तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच बेलवली येथे सुद्धा अशाच प्रकारे मास्क न परिधान तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता विवाह सोहळ्यास उपस्थित राहिल्याप्रकरणी 9 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करूनच लग्न सोहळा पार पाडावा, असे आवाहन वपोनि रवींद्र दौंडकर यांनी केले आहे.
Comments