परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करा - नगरसेवक मनोज भुजबळ
पनवेल / (प्रतिनिधी) परराज्यातून रेल्वेने येणार्‍या प्रवाशांची कोविडची आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय महानगरपालिका क्षेत्रात प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी नगरसेवक मनोज भुजबळ यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
       
या संदर्भात त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर यांनाही निवेदनाची प्रत दिली आहे. भुजबळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात थैमान घातलेले असून नव्याने म्युकर मायकोसिस ह्या बुरशीजन्य विकाराचे रुग्ण संख्या वाढत आहे.  पनवेल महानगर पालिकेच्या क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर डॉ.कविता चौतमोल,स भागृह नेते परेश ठाकूर आणि आपल्या सर्व प्रशासकीय कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नांने कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यास मोठ्या प्रमाणात यश आल्याचे दिसत आहे. परंतु ह्या यशाने आपण कोणीच गाफिल न राहता यापुढे आपण सर्वांनी मिळून कोरोनाची तिसरी लाट न येऊ देणे, अथवा कोरोंनाचे रुग्ण यापुढे वाढू नये, यासाठी जागरूक राहणे खूप महत्वाचे आहे. त्यातच नव्याने  वाढत असलेला म्युकरमायकोसिस हा आजारही वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
पनवेल हे वाढते शहर असून पनवेलमध्ये देशाच्या काना कोपर्‍यातून लोक, रहिवाशी वास्तव्यास आले आहेत. पनवेल मध्ये येणारे बर्‍याच अंशी लोक हे परराज्यातून ये जा करत असतात. तरी अश्या परराज्यातून येणार्‍या प्रत्येक नागरिकाचे पनवेल रेल्वे स्टेशन वर  कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करूनच पनवेल शहरात प्रवेश द्यावा. अन्यथा काही बाधीत रुग्ण जर सैरपणे शहरात फिरू लागले तर पुन्हा शहरात कोरोना संसर्ग वाढून येणारे संकट हे भीषण होईल, त्यामुळे याची दक्षता घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे नगरसेवक मनोज भुजबळ यांनी नमूद केले आहे. 
Comments