गव्हाणफाटा वाहतूक शाखे तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...

पनवेल / दि.१० :-  गव्हाणफाटा वाहतूक शाखे तर्फे वहाळ आदिवासीवाडी येथील २५  कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पोलीस आयुक्त नवी मुंबई बिपिन कुमार सिंग यांच्या संकल्पनेतून तसेच सह पोलीस आयुक्त डॉ जय जाधव ,पोलीस उपायुक्त वाहतूक नवी मुंबईचे पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शना खाली सह पो.आयुक्त वाहतूक भागवत सोनावणे यांच्या हस्ते व गव्हाणफाटा वाहतूक शाखे तर्फे सदर उपक्रम राबविण्यात आला. 
यावेळी गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, तेल, तूरडाळ, चणाडाळ, गूळ, चहापावडर, कांदे,बटाटे, मीठ आदी वस्तूचे कीट तयार करून वाटप करण्यात आले. लॉकडाऊन मुळे अनेकांची कामे बंद पडली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या आपत्तीची जाणीव लक्षात घेवून या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
Comments