घडाळ्याच्या दुकानासह फुड मॅजिक दुकानात घरफोडी


पनवेल, दि.24 (संजय कदम) ः एका बंद घडाळ्याच्या दुकानासह फुड मॅजिक दुकानात अज्ञात चोरट्यांनी केेलेल्या घरफोडीत मोठ्या प्रमाणात विविध कंपनीचे घड्याळे व रोख ररक्म असा ऐवज चोरुन नेल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे.
कामोठे वसाहतीमधील सेक्टर 21 प्रथम हेरीटेज शॉप नं.17 या ठिकाणी आर्ट वॉच या नावाचे दुकान नौशाद यांचे असून सदर दुकान बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने शटरच्या कुलूपाचा कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून शटर उघडून आत प्रवेश केला व शोरुममधील विविध नामांकित कंपन्यांची घड्याळे, रोख रक्कम तसेच शेजारील फुड मॅजिक दुकानातील रोख रक्कम असा मिळून जवळपास 26 हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments