पनवेल : 6 मे 2021 रोजी कोवीशिल्ड लस पनवेल महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध होणार आहे याकरिता पनवेल महानगरपालिकेकडून 5 तारखेला जाहीर केलेल्या लसीकरणाच्या पत्रकामुळे जेष्ठ नागरिक टोकन मिळविण्यासाठी पहाटे 5 वाजले पासून लाईन लावून उभे राहिले. पालिका कर्मचारी ९ नंतर येत असतात. त्यामुळे जागेवर सूचना फलक नसल्याकारणाने संभ्रम निर्माण झाला. यामुळे जेष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
पनवेल महानगरपालिकेकडून एक पत्रक मराठी आणि इंग्रजीमध्ये जारी करण्यात आले. लोकांच्या माहितीसाठी, परंतु त्यामध्ये UPHC- 2 चा पत्ता मराठी पत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिक सभागृह पनवेल आणि इंग्रजी पत्रकामध्ये अभिदीप बिल्डिंग, कोळीवाडा येथे असे दोन वेगवेगळे पत्ते देण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी अगदी पहाटेपासून ज्येष्ठ नागरिक संघ येथे गर्दी केली. पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याकडे पहाटे तशी तक्रार आल्यावर त्वरित त्यांच्या स्वयंसेवकांनी तेथे जाऊन नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले आणि कोळीवाडा येथे लसीकरण सुरू होणार आहे असे सांगितले.
सदरची चूक ही पनवेल महापालिकेकडून घडली आहे. आपल्याकडे कामाचा त्रास कमी मनुष्यबळा अभावी जास्त होत आहे . परंतु ही अशा प्रकारचा चूकिमुळे नागरिकांना विनाकारण त्रास होत आहे आणि अशा परिस्थितीत सदर विषयात गंभीरतेने लक्ष देऊन पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी, असे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी आयुक्तांना कळविले आहे.