महिलेची ६९ हजाराला फसवणूक...


पनवेल, दि.१ (वार्ताहर) ः लाईट बिल संदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून 32 वर्षे महिलेची 69 हजार 136 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विचुंबे, नवीन पनवेल येथे राहणार्‍या शिल्पा संदीप काळे यांनी मोबाईल वरून लाईट बिल भरले होते. सदरचे बिल एमएसईडी मध्ये भरले न जाता त्यांच्या बँक खात्यातून 1 हजार 70 रुपये रक्कम कमी झाली होती. सदरची रक्कम पाच ते दहा दिवसात त्यांच्या खात्यात जमा होईल असा मेसेज त्यांना आला होता. मात्र रक्कम खात्यात जमा न झाल्याने त्यांनी गुगल पे कस्टमर केअरचा नंबर प्राप्त केला. व त्यांची तक्रार सांगितली. त्यानंतर एका मोबाईल फोनवरून त्यांना कस्टमर केअर मधून करणकुमार बोलत असल्याचे सांगितले. व त्याने लाईट बिल संदर्भात असलेल्या तक्रारीबाबत शिल्पा यांना विचारणा केली, त्यावेळी तक्रारीचे निवारण करण्यासाठी त्याने शिल्पा यांना एनी डेस्क अ‍ॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी ते अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यानंतर समोरील इसमाने त्यांना ते ओपन करण्यास सांगितले. व मोबाईलवर आलेला एक कोड मोबाईल वरून मागून घेतला. त्यानंतर शिल्पा यांना गुगल पे अकाउंट ओपन करण्यास सांगितले. त्यांनी गुगल प्ले ओपन केले असता त्यांच्या अकाउंटमधून 69 हजार 136 रुपये वजा झाले.
Comments