1 लाख 71 हजारांची ऑनलाइन फसवणूक...
1 लाख 71 हजारांची ऑनलाइन फसवणूक

पनवेल दि.30 (वार्ताहर): आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक करण्याच्या बहाण्याने 51 वर्षे इसमाच्या खात्यातील एक लाख 71 हजार 200 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उरण, मुळेखंड येथे घडला आहे. आरोपी विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     
मुळेखंड- उरण येथील मनोज बाळकृष्‍ण तांबडे यांना अनोळखी मोबाईल नंबर वरून फोन आला. त्यावेळी त्याने त्याचं नाव रोहित कुमार असं सांगून बीकेसी येथील मेन ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगितले. यावेळी तुमचा आधार कार्ड बँकेत लिंक झालेले नाही आजची शेवटची मुदत असून 2 हजार 200 रुपये फाईन पडेल असे समोरील व्यक्तीने तांबडे याना सांगितले आणि त्याने आधार कार्ड नंबर मागितला. त्याला आधार कार्ड नंबर दिल्यानंतर त्याने एटीएम कार्ड नंबर मागितला. यावेळी एटीएम कार्डचा पासवर्ड आणि बँक अकाउंट नंबर देखील मनोज यांनी समोरील व्यक्तीला दिला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल एक लाख 71 हजार 200 रुपये वजा झाले. फसवणुक झाल्यानंतर मनोज कांबळे यांनी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Comments