गुन्हे शाखा कक्ष-02 पनवेलने केला देशी दारूचा साठा हस्तगत...

पनवेल : दि.17 (संजय कदम):सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवू नये म्हणुन राज्यभरामध्ये ल़ॉकडाउन चालु असताना देखील काही इसम हे देशी दारु संत्रा जीएम दारूच्या अवैधरित्या विक्री करीत असल्याने त्यांचेवर कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेशीत केले होते. त्या अनुशंगानेगुन्हे शाखा कक्ष-02 पनवेलचे वपोनि गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने पनवेल जवळील भिगांरी गाव येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या केलेला देशी दारूचा साठा हस्तगत केला आहे.          

गुन्हे शाखा कक्ष-02 पनवेलचे हेड कॉन्स्टेबल सुनिल कुदळे यांना माहिती मिळाली की, एक इसम हा भिंगारी गाव, पनवेल परिसरामध्ये एका सफेद रंगाच्या गोणीमध्ये देशी दारू संत्रा दारू आणुन विक्री करीत आहे. त्यानुसार पोलिस हवालदार मधुकर गडगे, निवृत्ती वाघ, पोलिस नाईक दिपक डोंगरे, पोलिस शिपाई प्रविण भोपी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन 180 ML च्या एकूण 90 देशी दारू संत्रा च्या बाटल्या सफेद गोणीमध्ये मिळुन आल्याने तेथील एका व्यक्तीस मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध पनवेल शहर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.        

फोटोः हस्तगत केलेला देशी दारूचा साठा
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image