आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पनवेल दि.08 (वार्ताहर): घरासमोर ब्लेडने डाव्या हाताच्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणा विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सुरेश बाबुराव काटकर (वय सत्तावीस, राहणारा देवीचा पाडा) असे या तरुणाचे नाव आहे.         
सुरेश काटकर याने ब्लेडने मनगटाची नस कापली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. हाताची नस कापली. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. जखमी झालेल्या काटकर यास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार सुरू आहेत.
Comments