खारघर मधील होमिओपॅथी रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी ...

पनवेल, दि.१९ (वार्ताहर) ः केंद्रीय आयुष  मंत्रालयाच्या वतीने  खारघर  सेक्टर 18 मध्ये उभारलेल्या होमियोपॅथी रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा अशी मागणी खारघर वासियांनी शासनाकडे केली आहे.

खारघर सेक्टर अठरा मधील प्लॉट नं.38,39, या भूखंडावरील केंद्रीय आयुष आरोग्य मंत्रालयाच्या वतीने 17 कोटी रुपये खर्च करून  63 हजार 170  स्क्वेअर फुट जागेत सेन्ट्रल कौन्सिल फोर रिसर्च इन होमियोपॅथी रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले झाले आहे.या रुग्णालयात एकून 30 खाटांचा समावेश आहे. तळमजल्यावर रीसेप्सन आणि बाह्यरुग्ण विभाग , दुसरा आणि तिसरा माळ्यावर प्रत्येकी 15 खाटा तसेच प्रयोगशाळा,सेमिनार हॉलचा आदींचा समावेश आहे. खारघर मध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिसरात एकही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. तर आर्थिक अडचणीमुळे अनेक रुग्णावर घरीच उपचार केला जात आहे. खारघर मध्ये सद्यस्थितीत 1500 पेक्षा जास्त विद्यमान कोरोनाचे रुग्ण आहेत. केंद्र शासनाने सिडकोच्या मदतीने खारघर सेक्टर अठरा मध्ये उभारलेले होमियोपॅथी रुग्णालय धूळ खात पडून आहे. सदर रुग्णालयात खारघर साठी  कोविड सुरु करावे अशी मागणी खारघर वासियांनी केली आहे. खारघर सेक्टर 18 मध्ये केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने बांधकाम केलेले होमिओपॅथी रुग्णालयात धूळ खात पडून आहे. पनवेल पालिका,आरोग्य मंत्री आदींना पत्र पाठवून सदर रुग्णालयात कोविड सेन्टर सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
Comments