सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नीलाताई पटवर्धन यांचे दु:खद निधन ..

पनवेल दि.11 (वार्ताहर)- : सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नीलाताई पटवर्धन यांचे आजदु:खद निधन झाले आहे.           
श्रीमती नीलाताई प्रभाकर पटवर्धंन यांचा जन्म ०६ जून १९३९ तर मृत्यू ११ एप्रिल २०२१ रोजी झाला. त्यांचे जन्मगाव- वावोशी तालुका: खालापूर , जिल्हा रायगड हे आहे. शालेय शिक्षण: वावोशी, पेण, रेवदंडा तर महाविद्यालयीन शिक्षण: बी.ए. , स.प महाविद्यालय पुणे, डिप्लोमा (लायब्ररी मॅनेजमेंट), वावोशी गावातील पहिली महिला पदवीधर, डॉ. प्रभाकर पटवर्धन यांच्यासोबत विवाह: २० जानेवारी १९६२ रोजी झाला. सन १९६४ पासून पनवेल निवासी. समाजकार्याचा वारसा वडील दत्तात्रय पांडुरंग उपाख्य नाना टिळक, वावोशी यांच्याकडून मिळाला. तसेच विवाहानंतर डॉ. प्र. कृ. पटवर्धन यांच्याबरोबरीने सामाजिक व सेवाकार्यात सक्रीय सहभाग. स्त्री सखी महिला औद्योगिक संस्था, स्वयंसिद्धा महिला पतपेढी, पनवेलमधील सर्व महिला मंडळांची एकत्रित ‘एकता महिला मंडळ’ अशा अनेक संस्थांच्या स्थापनेपासून महत्वाचा सहभाग. समाजातील गरीब-गरजूंना आर्थिक, वैद्यकीय मदत केली. कृष्णभारती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध मदतकार्ये केली. मेढे, तालुका रोहा येथे गरीब-गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालविले. ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, वासुदेव बळवंत फडके विद्यालयाचे सभागृह यांच्या उभारणीस मदत. वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यास भरीव मदत. १९९७ साली डॉ. प्रभाकर पटवर्धनांच्या अकाली निधनानंतर जागेसह सर्व हॉस्पिटल रा. स्व. संघ, जनकल्याण समितीला समर्पित केले. त्यांना आत्तापर्यंत गौरव व सन्मान: सामाजिक कार्याकरिता महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित. तसेच पनवेल भूषण व अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.            
Comments