डंपरची मोटारसायकलीस धडक
डंपरची मोटारसायकलीस धडक एक जखमी 

पनवेल दि.१८ (वार्ताहर)- डंपरची मोटारसायकलीस पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील डि पॉईंटकडून जे.एन.पि.टी. कडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडच्या बाजूला घडली आहे.          
मोटारसायकलस्वार विराज आंब्रे (वय-22) हा डि पॉईंटकडून जे.एन.पि.टी. कडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या डंपरने त्याच्या गाडीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments