पनवेल :- खारघर येथील सेक्टर ८ मधील रेडक्लिफ शाळेने ह्या कोरोनाच्या संकटात सामान्य जनतेसोबत विद्यार्थ्यांना सुद्धा संकटात टाकले आहे. कोरोना संकटात गेल्या एका वर्षात अनेक पालकांचे उद्योगधंदे, नोकरी, कामधंदा बंद पडले आहेत काही पालक तर हवालदिल झाले आहेत. आणि ही नुसती नवी मुंबईतील पालकांची परिस्थिती नसून अवघा हिंदुस्थान किंबहुना जगाची समस्या झाली असतांना.
ह्या परिस्थितीत शाळा मुजोरी करत आहेत.
फी साठी तगादा लावत आहेत आणि ह्याचा कहर म्हणजे ह्या रेडक्लिफ शाळेने तर पालकांसोबत आता मुलांना शिक्षा दिली आहे. KG पासून ते 10 वी पर्यंतच्या मुलांना अचानक ऑनलाइन क्लास मधून रिमूव्ह केले आहे. अचानक असं आपल्याला शिक्षणापासून वंचित का केले हे ह्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांना कळेनासे झाले आहे.
युवासेनेच्या राष्ट्रीय सहसचिव रुपेश पाटील यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून ह्या शाळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सर्वांना शिक्षण मिळावे हा २००९ साली संसदेत घटनेने दिलेला हक्क आहे. ह्यात सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळावा आणि त्याच हक्काने हे २५० विद्यार्थी ह्या शाळेत शिक्षण घेत होते.
पण मग पैसे नाही तर शिक्षण नाही असं ठरवून ह्या शाळेने कोणच्या आदेशाने ह्या विद्यार्थ्यांना गेल्या 15 दिवसापासून शिक्षणापासून वंचित ठेवले आहे ?
असा सवाल सह सचिव रुपेश पाटील यांनी शाळेला किंबहुना प्रशासनाला विचारला आहे.
आणि ह्या मुलांच्या शिक्षण हक्कासाठी रुपेश पाटील हे ह्या पालकांसोबत आंदोलनास तयार झाले असून लवकरच शाळे समोर ते मुलांच्या हक्क साठी ठिय्या आंदोलन करणार आहेत.
कोरोनाच्या काळात ही शाळा मुद्दाम फीचे कारण लावून असे मुलांना शिक्षण हक्कापासून वंचित ठेवत असेल तर कोरोना काळात पालकांना असे आंदोलन करावं लागतं असेल आणि कोरोना संक्रमण धोका वाढत असेल तर ह्याची जबादारी ही संपूर्ण शाळेची असेल कारण शाळा मुलाना काढून पालकांसोबत कोणताही संवाद ठेवत नाहीय. मग पालकांनी काय करावं ?
युवासेनेचे राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील यांनी हे प्रकरण सन्मानिय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांज पर्यंत मेलद्वारे पाठविले आहे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशाने पुढील कारवाही केली जाणार आहे असे सूचित केले आहे. शाळे सोबत रुपेश पाटील यांनी बोलणं केलं असून तातडीने मुलांना परत घ्या तरच पालक फी भरतील असा पवित्रा युवासेनेने घेतला आहे.