पनवेल / दि.२०( वार्ताहर) नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सामाजिक कार्यकर्त्या, पोलीस मित्र निता सुनील माळी यांची नमो नमो मोर्चा (भारत) च्या महिला मोर्चा रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निता माळी यांनी आतापर्यंत राजकीय, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय संघटक महामंत्री प्रभारी महाराष्ट्र विजय हटवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोपान उंडे पाटील, प्रदेश संघटन मंत्री सुर्यप्रकाश सिंह, राष्ट्रीय संघटन सहमंत्री आर.के.दिवाकर व प्रदेश महामंत्री अॅड.विकास थोरात यांनी घेवून त्यांची रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. याबद्दल समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो ः निता माळी