पनवेल, दि.९ (संजय कदम) ः टॉयलेटच्या खिडकीचे ग्रील तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून बेडरुममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यामध्ये असलेले सोन्याचे दागिने असा मिळून जवळपास 1 लाख 20 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
राजेंद्र गोसावी हे बी-101 चिन्मय गौरांग सोसायटी उरण नाका येथे राहतात. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या टॉयलेटच्या खिडकीचे ग्रील तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून बेडरुममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यामध्ये असलेले सोन्याचे दागिने असा मिळून जवळपास 1 लाख 20 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.