कळंबोलीत आठ किलो गांजाचा साठा हस्तगत ..
कळंबोलीत आठ किलो गांजाचा साठा हस्तगत 

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः अंमली पदार्थ विरोधी पथकाने कळंबोली येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा हस्तगत केला आहे. 
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 12 या ठिकाणी एका टपरीवर बेकायदेशीररित्या गांजाची विक्री होत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळताच सदर पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून जवळपास 8 किलोचा गांजा हस्तगत केला आहे व याप्रकरणी टपरी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments