नोकरीचे अमिष दाखवून एक लाख सत्तर हजारांची फसवणूक...


पनवेल दि.८ (वार्ताहर): बॅंकेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एक लाख सत्तर हजार उकळल्याचा प्रकार खारघर येथे घडला असून याबाबत खारघर पोलिस सदर आरोपीचा शोध घेत आहेत.
         
तक्रारदार कालीदास पवार यांची 4 वर्षांपूर्वी ओळख गोरखनाथ कराड यांच्यासोबत झाली. त्यांनी पवार यांना तुमच्या नातेवाईकांना देना बॅंकेमध्ये नोकरी लावतो यासाठी साहेबांना पैसे द्यावे लागतील असे सांगून वेळोवेळी वेगवेगळी कारणे देत 20 हजार, 40 हजार असे एकूण 1 लाख 10 हजार रूपये उकळले. त्याचप्रमाणे त्यांच्या ओळखीतील चव्हाण या व्यक्तीकडूनही 60 हजार रूपये घेतले होते. एवढी रक्कम देऊनही नोकरी लावण्यास कराडे यांनी टाळाटाळ केल्याने त्याच्याविरोधात पवार यांनी खारघर पोलिस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.
Comments