पनवेल, दि.28 (संजय कदम) ः रेमडेसिव्हीर इंजेक्शन देतो असे सांगून फसवणूक करणार्या त्रिकुटाला पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 83 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
साक्षीदार यांचे काका कोविड-19 आजाराने आजारी असल्याने पुणे येथे आंतररुग्ण उपचार घेत असल्याने त्यांना 04 रेमडेसीवीर इंजेक्शनची आवश्यकता होती. साक्षीदार यांना रेमडेसीव्हीर इंजेक्शनसाठी सदर गुन्हयातील आरोपी आकाश म्हात्रे याचेकडुन दुसर आरोपी सौरभ बोनकर यांचा मोबाईल नंबर प्राप्त झाला होता. त्यांनी आरोपी यास संपर्क करुन 04 रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी केली होती. त्याने साक्षीदार यांना तिसरा आरोपी अनिकेल तांडेल यांचा मोबाईलन नंबर देवुन पनवेल रेल्वे स्टेशन येथे 88,000/- रुपये घेवुन बोलावले होते. त्यानुसार साक्षीदार यांनी फिर्यादी यांना 88,000/- रुपये घेवुन दिनांक 26/04/2021 रोजी 12.30 वाजता पनवेल रेल्वे स्टेशन येथे पाठविले होते. नंतर आरोपी अनिकेत तांडेल याने फिर्यादी यांना बामणडोंगरी रेल्वे स्टेशनचे बाहेर बोलावुन त्यांच्याकडुन 88,000/- रुपये घेवुन 04 रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणुन देतो असे सांगुन गेला तो परत आला नाही. म्हणुन फिर्यादी यांनी आरोपीचे मोबाईलवर संपर्क केला असता आरोपीने खोटे सांगीतले की, पोलीसांनी पैसे व रेमडेसिव्हीर इंजेक्शन जप्त केले असुन तुम्ही पैसे परत मागु नका नाहीतर मी तुमचे नाव पोलीसांना सांगेल.’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे सदर आरोपींविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदार व तांत्रीक तपासाच्या आधारे सदर गुन्हयातील 03 पाहीजे आरोपींपैकी एका आरोपी अनिकेत बाळाराम तांडेल (रा.सूकापूर) याला सुकापुर तर पनवेल व 2 आरोपी सौरभ बोनकर (माणगाव) व आकाश म्हात्रे (माणगाव) या आरोपींना माणगांव, जि.रायगड येथुन अटक केली आहे. सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाणेचे वपोनि अजयकुमार लांडगे व पोनि (गुन्हे) संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि अनिल देवळे, पोउपनिरी सुनिल तारमळे, पोहवा नितीन वाघमारे, पोना परेश म्हात्रे, पोशि विवेक पारासुर, पोशि यादवराव घुले, पोशि सुनिल गर्दनमारे, पोना विनोद पाटील, पोना पंकज पवार, पोना गणेश चौधरी, पोशि राजु खेडकर, व पोशि साळुंखे यांनी केली आहे.
चौकट
कोविड-19 आजारामध्ये वापरण्यात येणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली होत असल्याने कोणीही अशाप्रकारे खाजगी इसमांना रेमडेसिव्हीरसाठी पैसे देवन फसवणुक करुन घेवू नये.
अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक