उभ्या टँकरला मागून आलेल्या ट्रकची धडक ; २ ठार....
उभ्या टँकरला मागून आलेल्या ट्रकची धडक ; 2 ठार
पनवेल, दि.21 (संजय कदम) ः रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुभाजकाकडील पहिल्या लेनवर उभ्या करून ठेवलेल्या टँकरला पाठीमागून आलेल्या दुसर्‍या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील नांदगाव गावासमोरील उड्डाण पुलावर टी-पॉईंट कडून पळस्पेकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली आहे.

नादुरुस्त टँकर क्र.एमएच-46-एफ-4261 वरील चालक नाम्या अख्तर अली याने त्याचा टँकर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुभाजकाकडील पहिल्या लेनवर उभ्या करून ठेवला असताना पाठीमागून ट्रक क्र.एमएच-42-टी-8390 घेवून येणारा चालक राजेंद्र दादा कांबळे (40) याला सदर टँकर न दिसल्याने त्या टँकरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते स्वतः गंभीररित्या जखमी झाले. तसेच टँकर चालक अख्तर अली सुद्धा गंभीररित्या जखमी होवून त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

फोटो ः अपघातग्रस्त वाहने
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image