परिक्षार्थींना वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये प्रवासास परवानगी...



पनवेल / प्रतिनिधी  : ज्या परीक्षार्थीना स्पर्धा परिक्षा तसेच अन्य परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहवयाचे आहे, अशा परिक्षार्थ्यींना ‘वीकेण्ड लॉकडाऊन (शनिवार-रविवार लॉकडाऊन) कालावधीतसुद्धा आवश्यक प्रवास करण्यास परवानगी असेल. परिक्षार्थ्यांजवळील हॉल तिकीट हा प्रवासासाठीचा वैध पुरावा मानला जाईल. तसेच प्रत्येक परीक्षार्थीच्या सोबत  एकास प्रवासास परवानगी असेल . 

आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड 19 चे प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे आदेश लागू केले आहेत. त्यांस अनुसरून आज काही अतिरीक्त सूचना जाहीर केल्या आहेत.

ऑनलाईन अन्न पुरवठा वितरीत करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेतील अन्न पुरवठाधारक उदा. झोमॅटो, स्विगी आदींना आठवड्यातील सर्व दिवस चोवीस तास सेवा पुरविण्यास परवानगी आहे. याबरोबरच वीकेण्ड लॉकडाऊन दरम्यान हॉटेलमधून नागरिकांना स्वत: जाऊन पार्सल घेण्यास परवानगी असणार नाही . परंतू रेस्टॉरंट किंवा खानावळीमधून पार्सल पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वीकेण्ड लॉकडाऊन च्या दरम्यान फळ विक्रेत्यांसह रस्यांेेच्या कडेला खाद्यपदार्थांची विक्री सुरू ठेवता येतील, परंतू केवळ पार्सल सेवा देता येईल. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलजवळ उभे राहून खाता येणार नाही.

डोळ्यांचे सर्व दवाखाने आणि त्या अनुषंगाने चष्म्यांची दुकाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या कालावधीत सुरू राहतील. 

हे आदेश 30 एप्रिलपर्यंत लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करण्याऱ्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image