दमदाटी करून लोखंडी रॉडने मारहाण...
दमदाटी करून लोखंडी रॉडने मारहाण
पनवेल, दि.१७ (वार्ताहर) ः  कामावर यायचे नाही अशी दमदाटी करून लोखंडी रॉडने 36 वर्षे इसमास मारहाण करण्यात आली आहे.  आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वलप येथे राहणारा रामभुज भोला यादव हा तळोजा येथील दीपक फर्टीलायझर कंपनी ऑपरेटर म्हणून काम करत आहे. तो कंपनीत सायकलने प्रवास करत असतो. तो सायकलने वलप येथे जाण्यासाठी रस्त्याने निघाला असताना वलप गावातील हनुमान मंदिराच्या अलीकडे डांबरी रस्त्यावर अंधारात अचानक मोटरसायकल त्याच्या पुढे येऊन थांबल्या. त्यातील तीन अनोळखी ईसमानी त्याच्या टी शर्टची कॉलर पकडली. व त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातील तिघांनी लोखंडी रॉडने त्याच्या पायावर मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तू कामावर कशासाठी येतोस, उद्यापासून कामावर यायचे नाही असे बोलून ते मोटरसायकलवर पनवेलच्या दिशेने पळून गेले. जखमी रामभुज यादव याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले.
Comments