पनवेल :- पत्रकार हरेश साठे यांचा वाढदिवस काडेचिराईत या वनौषधींचे रोप भेट देवून साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संजय कदम, सुभाष वाघपंजे, बाळकृष्ण कासार, विक्रम येवले, राजू गाडे, प्रवीण मोहोकर, संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.आर्या प्रहरचे संपादक सुधीर नामदेव पाटील यांच्या हस्ते पत्रकार हरेश साठे यांना काडेचिराईत या वनौषधींचे रोप भेट देण्यात आले. यावेळी सुधीर पाटील यांनी काडेचिराईत या वनौषधी बद्दल माहिती देताना सांगितले की, काडे चिराईत ही वनस्पती लिव्हर विकार, उदर विकार, अपचन, ताप, कफ, पित्त, कृमी, श्वास, प्रदर,आमवात यावर खूपच उपयुक्त आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून वनौषधी रोपे भेट देण्याची नवी संकल्पना पनवेल मध्ये आर्या प्रहरचे संपादक व आर्या वनौषधी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी प्रत्यक्षात आणली आहे.
उत्स्फूर्तपणे वनौषधी रोपे भेट देणे, रोपे लावणे,लावलेल्या रोपांचे जतन करण्याची सवय सुधीर पाटील यांनी स्वतःला लावून घेतली आहे असे मनोगत जेष्ठ पत्रकार बाळकृष्ण कासार यांनी यावेळी व्यक्त केले.