खारघर मधील कोरोना तपासणी केंद्रावरील चाचण्यांची वेळ वाढवा ; गुरुनाथ पाटील

खारघर / वार्ताहर :- खारघर मध्ये कोरोना रूग्णांची वाढ दिवसेदिवस होत असताना, संशयित रूग्णांची चाचणी दुपारी १२.३० नंतर केली जात नसल्यामुळे तपासणीसाठी येणाऱ्या
नागरिकांना माघारी फिरावे लागते. 

जवळ- जवळ तीन लाख लोकवस्ती असलेल्या खारघर शहरामध्ये केवळ एकच कोरोना चाचणीचे केंद्र सुरू आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रावर कायम गर्दी असते, मात्र आरोग्य केंद्रात चाचणीसाठी येणाऱ्या करोना रूग्णांची दुपारी १२.३० नंतर चाचणीच केली जात नसल्याने, रूग्णाना माघारी जावे लागते.

लोकांच्या आरोग्याचा विचार करून चाचण्यांची वेळ वाढवावी, अशी मागणी पनवेल तालुका शिवसेना महानगर समन्वयक  गुरुनाथ पाटील यांनी पत्राद्वारे पनवेल महानगरपालिका आयुक्त  यांच्याकडे केली आहे.

Comments