कोरोना संकटात वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब - गरजूंना तसेच वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचे वाटप..

पनवेल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण विश्वाला पुन्हा एकदा जेरीस आणले असून कोट्यवधी बाधित झालेल्यांपैकी लाखों लोकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहेत. 
राज्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर बनत चालली आहे, अशातच राज्यसरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉक डाऊन चा पर्याय निवडला आहे, त्यामुळे  उपासमारीची वेळ पुन्हा एकदा अनेक गरीब गरजूंवर आली आहे. 
     
या संकट काळात सर्वश्रुत असलेल्या  समाजसेविका आणि पनवेल वार्ता वेब न्युज् चॅनेल च्या मार्फत अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या रुपालीताई शिंदे यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. स्वतःला समाजासाठी कसे झोकून द्यावे हे या व्यक्तीमत्वाकडून शिकावे. ज्याने हाक दिली त्याच्या हाकेला प्रतिसाद दिलाच असा त्यांचा स्वभाव. मनमिळाऊ, कर्तृत्ववान, मेहनती असे व्यक्तिमत्व शोधून ही सापडणार नाही अश्या सर्वांच्या लाडक्या रुपाली शिंदे ताई यांनी त्यांच्या 22 एप्रिल 2021 रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व मायेचा घास गरीब गरजूच्या पोटात जावा या उद्दात भावनेने कोरोनाच्या पार्शवभूमीवर शासन नियमांचे पालन करून मास्क चा वापर करून नवीन पनवेल झोपडपट्टी वसाहत येथे लहान मुलांना अन्नदान केले. व प्रसंगी केक कापून आपला वाढदिवस त्या चिमुकल्यांसह साजरा केला. सोशल अंतराचे पालन करून सर्व चिमुकल्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू हे वाढदिवस सार्थक झाल्याचा प्रत्यय यावेळी आला असे रुपालीताई म्हणाल्या. तसेच घरीच रहा, सुरक्षित रहा असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. 
    
तसेच आणखी एक स्तूप्त्य उपक्रम म्हणजे नेरे या ठिकाणी स्नेहकुंज वृद्धाश्रम आहे त्याठिकाणी देखील रुपालीताई शिंदे यांनी तेथील वृद्धाना स्नेहभोजन दिले. साध्या पद्धतीने वाढदिवस कमीत कमी गर्दीत आज आपला वाढदिवस साजरा केला.
Comments