मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांची माझा प्रभाग माझी जबाबदारी अंतर्गत रहिवाशांना वेळोवेळी मदत...
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने काम करीत असणारे कार्यक्षम मा.उपमहापौर नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील हे आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यास नेहमीच तत्पर असतात. आजही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांना रक्त तसेच प्लाझा आवश्यक गोष्ट असते. यावेळी ते मदतीला धावून जावून सोशल मिडीयाच्या माध्यमातून व इतर संपर्कातून सदर गरजवंतांना त्वरित मदत करीत आहेत.

प्रभागातील नागरिक असो किंवा पनवेल परिसरातील गरजवंत असो त्याने आपल्याला असलेली समस्या विक्रांत पाटील यांच्या समोर मांडल्यावर तत्परतेने विक्रांत पाटील व त्यांचे सहकारी कामाला लागून त्या व्यक्तीला आवश्यक असणारा प्लाझा, रक्त, रुग्णालय, इंजेक्शन आदींची मदत करत असतात. यासाठी त्यांनी त्यांच्या पायोनिअर विभागातील जनसंपर्क कार्यालयात वेगळा विभाग उभारला असून त्याद्वारे ते नागरिकांना मार्गदर्शन करीत असतात. त्याचबरोबर प्रभागातील पाणी, वीज, गटारे आदी समस्यांचे निवारण सुद्धा ते करीत असल्याने त्यांच्या प्रभागातून त्यांचे कौतुक होत आहे.

Comments