बामण डोंगरीचे अष्टपैलू कलाकार शांताराम बामा पाटील यांचे दुःखद निधन ...

पनवेल / वार्ताहर :- गव्हाण पंचक्रोशीतील व उलवे नोड नवी मुंबई मधील बामण डोंगरी गावचे अष्टपैलू कलाकार शांताराम बामा पाटील यांचं. वयाच्या 86 व्या वर्षी बामण डोंगरी येथील निवासस्थानी  अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
         शांताराम पाटील हे प्रसिद्ध गणपती मूर्तिकार  व पेंटर म्हणून  सर्वांना परिचित होते.  तसेच कारपेंटर म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते  शेतीच्या अवजारां पासून ते  ग्रामीण भागातली घरांची सर्व प्रकारची बांधकामे ते करीत असत.  संगीताची हीआवड त्यांना होती. संगीत  भजनात ते पखवाज वाजवयाचे. गावात होणार्‍या हनुमान मंदिरातील रोजच्या हरिपाठात त्याची हजेरी असायची  गावातील संस्कृतीक कार्यक्रम  आयोजनात त्यांचा पुढाकार असायचा 
मृत्यू समय काही एक तास अगोदर त्यानी हरिपाठ ऐकण्याची  इच्छा व्यक्त केली व हरिपाठ करणाऱ्या सर्वांना जेवण देण्याचे त्यांनी कुटुंबियांना सुचवले. त्याप्रमाणे  त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची इच्छा पूर्ण केल्यानंतर  काही तासांतच 
 त्यांचं निधन झालं.
  प्रेमळ अजात शत्रू म्हणून ते पंचक्रोशीत परिचित होते. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image