खारघर मधील गुरुद्वारा तर्फे ऑक्सिजन सिलेंडर वाटप...
पनवेल, दि. २४ (वार्ताहर) ः गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने बहुतांश रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासत आहे. कोरोना रुग्णांना लागणारी ‘ऑक्सिजन’ची गरज ओळखून खारघर मधील गुरुद्वारा तर्फे मिनी आणि मोठे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्यात आले आहेत.
‘ऑक्सिजन सिलिंडर’ची आवश्यकता असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाचा कोरोना अहवाल सादर केल्यास गुरुद्वाराकडून विनामूल्य मिनी आणि मोठा ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिला जात आहे. खारघर मधील गुरुद्वारा तर्फे दोन दिवसात 25 मिनी ऑक्सिजन सिलिंडर तर 2 मोठे ऑक्सिजन सिलिंडर विनामूल्य वाटप करण्यात आले. 
दरम्यान, ‘मिनी ऑक्सिजन सिलिंडर’ची गरज असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी खारघर मधील सेंट्रल पार्क शेजारी असलेल्या गुरुद्वारा मध्ये संपर्क साधावा, असे आवाहन खारघर गुरुद्वारा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image