रस्त्यावर थुंकणाऱ्यावर पोलिसांची कारवाई ;पनवेल शहर पोलिसांची मास्क न घालणाऱ्यावर कारवाईचा बडगा , उरण नाका परिसरातील घटना...


पनवेल,(प्रतिनिधी) -- कोरोनाने सगळ्या जगात हाहाकार माजवला आहे. तरी लोकांचे खर्या खाऊन रस्त्यावर थुंकणे काही बंद होत नाही. रस्त्यावर थुंकणे, मास्क न वापरणे अशा सवयीमुळे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करीत आहेत. मात्र उरण नाका परिसरात रविवारी सकाळी मास्क न घालत रस्त्यावर थुंकणाऱ्या बहादुराला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला.

पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस विभाग आणि महानगरपालिकेचे कर्मचारी संयुक्तिकरित्या कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये पनवेल महापालिकेचे सात भरारी पथक नेमली आहेत. यांच्या बरोबरच परिमंडळ 2 मधील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱयांची नेमणूक या भरारी पथकामध्ये देखील केलेली आहे. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या सूचनेनुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहेत. या पथकामार्फत मास्क न घालणे, सोशल डिस्टन्स आदी कारवाया करण्यात येत आहेत. रविवारी सकाळी पनवेल परिसरातील उरण नाका भागात पथकाची मास्क न घालणाऱ्या यामध्ये पायी चालत जाणाऱ्या, चारचाकी वाहनांमध्ये, दुचाकी असलेल्या विना मास्क असलेल्या नागरिकांवर कारवाई करीत होते. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्शवभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास देखील कारवाई होत आहे. थुंकीतून कोरोनाचा प्रसार होतो. खर्या, तंबाखू, पान खाणाऱ्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. मात्र पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पथक कारवाई करीत असताना एक व्यक्ती मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचे पथकाच्या निदर्शनास येताच पोलिसांनी त्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला तसेच त्याच्याकडून दंड वसूल केला. पनवेल महापालिका किंवा पोलीस प्रशासन वेळावेळी कारवाई करीत असते. मात्र पनवेलमधील नागरिकांचा निष्काळजीपणा कशासाठी ? असा सवाल उपस्तित होत आहे.
Comments