किराणा दुकानात घरफोडी

पनवेल, दि.१७ (वार्ताहर) ः किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून जवळपास ७० हजाराची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना तालुक्यातील कसळखंड येथे घडली आहे. 

कसळखंड येथील बाळाराम मते यांचे बस स्टॉपच्या बाजूला किराणामाल विक्रीचे दुकान आहे. ते घरी झोपलेले असताना त्यांना लोखंडी कपाटात ठेवलेले 70 हजार रुपये दिसून आले नाही. बाळाराम मते हे रात्री झोपताना किचनच्या मागचे दार लावायचे विसरून गेले होते. त्या वेळी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून चोरी केली.
Comments