सोसायटीच्या नावाने बनावट लेटरहेड पत्र तयार करून बँकेतून कर्ज मिळविणार्‍यावर गुन्हा दाखल...


पनवेल,दि. २९ (वार्ताहर) ः कर्ज मिळविण्यासाठी मूळ मालकाच्या सोसायटीच्या लेटरहेडवर बनावट पत्र बनवून सदर पत्र बँकेत सादर करून बँकेतून मिळालेले कर्ज स्वतःच्या खात्यात वर्ग केल्याप्रकरणी एका इसमाविरोधात तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी परबत पटेल यांचा देवकृपा एंटरप्रायझेस या नावाने बिल्डींग कंन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तळोजा एमआयडीसीतील प्लॉट नं.जे-7, जे-8, जे-9 चे मुळ मालक एम.आर.ब्रदर्स आणि असोसिएशन इंडस्ट्रीयल को.ऑप.सो.लि. यांनी सदर जागेवर फिर्यादी यांच्या मार्फतीने कोहिनूर व्यापारी औद्योगिक संकूल बनविले आहे. यातील आरोेपी मनसुरअली एस.मिठाईवाला यांनी फिर्यादी यांचे तळोजा एमआयडीसी येथील प्लॉट नं.जे-7, जे-8, जे-9 या जागेवर बांधण्यात आलेले कोहिनूर औद्योगिक संकुलामध्ये एकूण 12 व्यापारी गाळे विकत घेण्यासंबंधाने करार केला व सदर व्यवहारासाठी युनियन बँक ऑफ इंडिया रे-रोड शाखा, मुंबई येथून कर्ज मिळविण्यासाठी यातील जागा मालक एम.आर.ब्रदर्स सोसायटी यांच्या लेटरहेडवर बनावट पत्र तयार करून नमूद बँकेत सादर केले व बँकेतून मिळालेले कर्ज स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतले. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबत अधिक तपास पोेलीस निरीक्षक (गुन्हे) संजय नाळे करीत आहेत.
Comments