मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांना सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्यावतीने श्रद्धांजली अर्पण...

पनवेल/प्रतिनिधी: सेवा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने खांदाकॉलनी येथे भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.माजी पोलीस मुंबई आयुक्त धनंजय जाधव यांचे काही दिवसापूर्वी हॉस्पिटल मध्ये उपचार दरम्यान निधन झाले धनंजय जाधव हे 1973 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते 1992 च्या काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना पोलीस पदक प्रदान करून गौरोवन्यात आले होते,2007 मध्ये धनंजय जाधव यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारली होती.

पोलीस महासंचालक म्हूणन महामार्ग सुरक्षा पथकाच्या प्रमुखपदी जबाबदारी दिली होती. निवृत्त झाल्या नंतर माजी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना न्याय मिळावा या करिता सेवा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी असोसिएशन स्थापन करून निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याना न्याय मिळण्यासाठी झटत होते, त्यांच्या जाण्याने निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा आधार गेला असे मत व्यक्त होत आहे.धनंजय जाधव याच्या आठवणीसांगताना निवृत्त पोलीस उपयुक्त श्री.शिवाजीराव देसाई यांना डोळ्यातले अश्रू अडवता आले नाही श्रद्धांजली वाहताना निवृत्त पोलीस उपायुक्त श्री. शिवाजीराव देसाई, निवृत्त पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठलराव देसाई, श्री.प्रकाश मुळीक माजी. पशु शासकीय अधिकारी, माजी. पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र ताटे, माजी पोलीस उपनिरीक्षक श्री.मदन खरे,माजी ASI श्री.सिधु  पवार, माजी. ASI श्री. तानाजी माने, हवालदार श्री. वसंत बोराडे, हवालदार श्री.ज्ञानेश्वर धादवट, ASI श्री. अजित शिंदे, ASI श्री.संपत पवार, श्री.श्रीरंग शिंदे,श्री. निलेश देशपांडे महाराज, सौ. स्वाती साळूंखे पोलीस हवालदार कलबोली, माजी.ASI श्री. प्रकाश जाधव, पत्रकार श्री. संतोष शिवदास आमले आदि उपस्थित होते.
Comments