ट्रस्ट इंडिया ब्रॅंडच्या विविध प्रोडक्टचे लोकार्पण
ट्रस्ट इंडिया ब्रॅंडच्या विविध प्रोडक्टचे करण्यात आले लोकार्पण
पनवेल / दि.२१ (संजय कदम)- पनवेल येथे ट्रस्ट इंडिया ब्रॅंडचे सॅनिटायझर व मास्क ह्या प्रोडक्टचे उद्घाटन माजी शिवसेना पनवेल उपमहानगर संघटक सुनीत ठक्कर यांच्या हस्ते व ट्रस्ट इंडिया ब्रॅंडच्या अंबेसिटर नूतन पाटील उपस्थितीत करण्यात आले.
          
सध्या कोव्हिडच्या काळात मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर व मास्कला नागरिकांकडून मागणी आहे. सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा परवडेल या दरात तसेच अत्यंत टिकाऊ व चांगल्या दर्जाचे प्रोडक्ट यावेळी लोकार्पण करण्यात आले. सदर वेळी ट्रस्ट इंडियाचे मालक दिलीप संघवी, सचिन चव्हाण, अरुण मालपाणी, सुजाता गायकवाड आदी उपस्थित होते. ट्रस्ट इंडियाचे सर्व प्रोडक्ट्स सर्व मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत.          

फोटोःट्रस्ट इंडिया ब्रॅंडच्या विविध प्रोडक्टचे लोकार्पण कऱताना शिवसेना उपमहानगर संघटक  सूनित ठक्कर, ट्रस्ट इंडिया ब्रॅंडच्या अंबेसिटर नूतन पाटील, ट्रस्ट इंडियाचे मालक दिलीप संघवी, सचिन चव्हाण, अरुण मालपाणी, सुजाता गायकवाड आदी
Comments