खारघर परिसरात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍यास अटक...

पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः करोना च्या पेशंट्स ला रेमडेसिव्हर इंजेक्शन हे जीवनदान ठरत आहे त्यामुळेच त्याची प्रचंड प्रमाणात मागणी होत आहे त्याचाच फायदा घेऊन काही समाजकंटक लोक सदर  रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार  करत आहेत अशा तक्रारी मोठ्याप्रमाणात होत आहेत. 

काल रात्री लिटल वर्ल्ड मॉल समोरील रोडवर खारघर येथे  एक इसम सदर रेमडेसिव्हर इंजेक्शन विकण्यास येणार असल्याची माहिती मिळताच मध्यवर्ती गुन्हे शाखेतील पोलीसांनी सापळा रचून सदर इसमास अटक करून त्याचे ताब्यातील दोन रेमडेसिव्हर इंजेक्शन ताब्यात घेऊन खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. तरी अशाप्रकारे कोणी रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असेल तर तात्काळ खारघर पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा असे आवाहन खारघर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ह्यांनी केले आहे.
Comments